आभाळमाया – धूमकेतूंचे रंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक, [email protected]

गेल्या दोन आठवडय़ांत तीनवेळा अवकाश निरीक्षणाचा आनंद मिळवला. एकदा वातावरण थोडे ढगाळ असल्याने तारकासमूहांमधले बारकावे स्पष्टपणे नजरेत आले नाहीत तरी दहा आणि आठ इंच व्यासाच्या परावर्तित (आरशाच्या) दुर्बिणीतून शुक्र, शनी, गुरू, मंगळ आदी ग्रह फारच छान दिसले आणि मृग नक्षत्रातला तेजोमेघही (ओरायन नेब्युला) चांगल्यापैकी पाहता आला. शे-दीडशे उत्सुक लोकांसह अवकाशदर्शन करताना अधिक बरं वाटतं. खगोलशास्त्राविषयीच्या, स्पेस सायन्ससंबंधीच्या अनेक प्रश्नांचा, शंकांचा ऊहापोह प्रश्नोत्तरांच्या तासाच्या वेळी होतो. आमचे अभ्यासक सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरं द्यायचा प्रयत्न करतात आणि पूर्वीसुद्धा चर्चेत आलेल्या प्रश्नांबाबत नव्याने काही जाणून घेता येते.

चाळिसेक वर्षे अवकाशदर्शन केल्याचे सांगितल्यावर ‘‘तेच तेच अवकाश पाहून पंटाळा येत नाही का?’’ पिंवा ‘‘बोअर होत नाही का?’’ असेही प्रश्न व्यक्तिगत चर्चेत कोणी विचारतात. तेव्हा रोजचा सूर्योदय तसाच असतो, पण रोज सकाळी नव्या उमेदीने, उत्सुकतेने प्रसन्नता येते. आपण अनेकदा ‘सनराइज’ पिंवा ‘सनसेट’ पॉइंटवर का जातो याचं उत्तरही अशा आनंदातच दडलेलं असतं असं म्हटल्यावर विचारणाऱ्याला पटतं. ती मंडळी पुनः पुन्हा अवकाश पाहायला येतात.

त्यातही तात्कालिक आकर्षण असेल तर अधिकच गर्दी होते. कधी उल्कावर्षाव, कधी ग्रहण पिंवा धूमकेतू अशा खगोलीय घटना सुखावणाऱ्या असतात. गेल्या दोन कार्यक्रमांत आम्ही ‘ज्विकी ट्रन्झिट फॅसिलिटी’ या वेधशाळेतून शोधला गेलेला आणि ध्रुवताऱ्याच्या जवळ दिसणारा ‘ग्रीन कॉमेट’ पिंवा हरित धूमकेतू पाहिला. अर्थात त्याचं दिसणं यथातथाच होतं. कारण या धूमकेतूची शेपूट पिंवा पिसारा अद्याप विस्तारलेला नाही. एखाद्या धूसर ठिपक्यासारखाच तो दिसला. कापसाचा छोटासा पुंजका दिसावा तसा. 11 जुलै 2007 मध्ये शोधलेला हा ‘झेडटीएफ’ धूमकेतू 42 हजार वर्षांनी येणारा ‘पाहुणा’ आहे. यापूर्वी तो येऊन गेला असेल तेव्हा माणसाला ते कळले नसेल आणि पुन्हा येईल तोपर्यंत शेकडो पिढय़ा झालेल्या असतील. त्यामुळे असे धूमकेतू धूसर दिसले तरी न्याहाळणे ही ‘लाइफटाइम’ महत्त्वाची घटना असते.

धूमकेतूंना रंग कसे प्राप्त होतात याची माहिती घेण्यापूर्वी एकदा ‘धूमकेतू’ म्हणजे काय याची उजळणी केलेली बरी. गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षांत इकियासाकी, काहौतेक, हॅली, हेल बॉप, हय़ाकुताके, स्विफ्ट टटल, नोवाइज असे अनेक धूमकेतू पाहण्याची संधी मिळाली. त्यातले पहिले दोन धूमकेतू केवळ कुतूहल म्हणून पाहिले होते. ‘हॅली’पासून अभ्यासाच्या, विज्ञानाच्या दृष्टीने त्याकडे पाहायची सवय लागली आणि या अनाहूत नसलेल्या, निश्चित कालक्रमाने दिसणाऱ्या अवकाशी पाहुण्याविषयी जास्त कुतूहल वाटत गेले.

धूमकेतू हा बर्फ, वाळू, दगड आणि काही वायूंचा एक गोळा असतो. तो जसजसा सूर्याजवळ येऊ लागतो तसतशी त्याला शेपूट फुटते ही धुराची पताका म्हणजे धूमकेतू. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूच्या बर्फाळ गोळय़ातील धूळ, दगड विलग होतात. त्यात काsंडलेले वायू बाहेर पडतात आणि त्यांची शेपूट तयार होते. ही शेपूट कधी नुसती पांढरी तर कधी लाल-निळी पिंवा हिरव्या रंगाचीही दिसते. ‘हय़ाकुताके’ धूमकेतूच्या मीटरभर लांब शेपटाला हिरवट रंग प्राप्त झाला होता.

‘झेडटीएफ’ या नव्या धूमकेतूमध्येही असाच वायूचा साठा असल्याने त्याचा रंग हिरवा दिसतोय. सूर्याच्या उष्णतेने धूमकेतू विरघळायला लागला की, त्यातील प्रचंड गोठलेला बर्फ बाहेर पडताना बहुधा निळसर, लाल असे रंग दिसू लागतात. धूमकेतू हे अतिशीत असतात. त्यातील द्रव्यावर सूर्याच्या उष्णतेचा परिणाम होऊन त्याच्या शेपटीत रंग भरतात. या पिंवा आधीच्या ‘हय़ाकुताके’चा रंग हिरवट दिसण्याचं एक कारण म्हणजे त्यातील काsंडलेल्या वायूमध्ये असलेले कार्बन आणि सायनोजेनचे प्रमाण. डायअॅटोमिक म्हणजे दोन अणूंच्या (सी-2) सूर्याची अतिनील किरणे पडून हिरवा रंग निर्माण होतो.

याशिवाय धूमकेतूच्या गोलकातील धूळ आणि बर्फात बदल होत असल्याने तो वेळोवेळी वेगवेगळे रंग दाखवू शकतो. वैज्ञानिक कारणं अधिक स्पष्ट करण्यासाठी धूमकेतूमध्ये दडलेल्या रासायनिक गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं. अर्थात हे फारच ‘अॅपॅडेमिक’ काम आहे. सर्वसामान्यांना मात्र सूर्याच्या अंतर्भागातील नैसर्गिक ‘अणुभट्टी’द्वारे हायड्रोजनचं हिलियममध्ये रूपांतर होताना निर्माण होणाऱ्या ‘प्रकाशकणां’ची (पह्टॉन) वैज्ञानिक माहिती नसली तरी कोवळय़ा उन्हाचा आस्वाद घेणं आरोग्यकारक आणि आल्हाददायक वाटतं. तसंच रंगीत धूमकेतूंचं ‘दर्शन’ झाल्यावर वाटतं.

विश्वातील अनेक गोष्टींमागची रहस्यं गेल्या वैज्ञानिक अभ्यासातून उकलण्यास मदत झाली. धूमकेतू या एकेकाळी ‘अशुभ’ वगैरे मानल्या गेलेल्या ‘शेंडे नक्षत्रा’च्या दर्शनासाठी आता शेकडो लोक रात्र जागवतात. धूमकेतूंचे रंग आणि ढंग काही न्यारेच असतात. त्यांच्या उगम आणि अस्तित्वाविषयी सविस्तर वाचू या पुढच्या लेखात.