माघातील गणेशोत्सव

52

खापरादेव मंडळाच्या वतीने 7 ते 12 फेब्रुवारीदरम्यान ‘माघी श्री गणेश जयंती’ उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव करी रोड (पूर्व) येथील रामदूत वसाहत पटांगणात होणार असून यंदा या उत्सवाचे 19वे वर्ष आहे. यावेळी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. गुरुवार, 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ‘बाप्पाचा भव्य आगमन मिरवणूक सोहळा’ होणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी पूजन, आरती, पालखी मिरवणूक, विभागातील महिलांच्या हस्ते आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान 5.30 वाजता काकड आरती, 9 फेब्रुवारी रोजी गणेश याग, बाप्पाची आरती, रात्री 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता सत्यनारायणाची महापूजा, बाप्पाची आरती, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. 11 फेब्रुवारी रोजी काकड आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील. 12 फेब्रुवारी रोजी काकड आरती, उत्तरपूजा व श्रींची आरती होणार असून सायंकाळी श्रींचा विसर्जन मिरवणूक सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत. यावेळी गुढी पाडवा शोभायात्रा, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गोविंदा उत्सव, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, आरोग्य शिबीर, स्वच्छता अभियान, कोजागिरी पौर्णिमा, खापरादेव प्रीमियर लीग आदी कार्यक्रम मंडळातर्फे यंदा राबवण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या