
>> दिलीप जोशी
आकाशदर्शनाचा आनंद घ्यावा असे सध्याचे दिवस आहेत. सध्या रात्र तुलनेने मोठी आहे. मार्च महिन्यानंतर दिवसाचा प्रकाशमान काळ वाढायला सुरुवात होईल. गेल्या वर्षी आणि आताही रात्रभराच्या आकाशदर्शनाच्या कार्यक्रमांवर कोविडने ‘संक्रांत’ आणली. अजूनही काही काळ समूहाने आकाशवेध घेणे कठीणच दिसते, पण परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याने पाहूया पुढे काय होते.
मार्गशीर्ष महिन्यात मृग नक्षत्र रात्रभर आकाशात दिसते. म्हणूनच त्याला मृगशीर्षवरून ‘मार्गशीर्ष’ असे नाव आहे. पौष महिना सुरू झालेला असला तरी ‘मृगा’चं देखणं नक्षत्र रोज संध्याकाळी निरभ्र आकाशात तळपताना दिसतंय. गेल्या काही दिवसांत त्याचं सतत निरीक्षण करून आणि ‘दो गज दूरी’ राखून काही जणांना ते दाखवताना मौज वाटली. या एका नक्षत्राद्वारे आपण बऱयापैकी ‘कॉस्मॉलाजी’ किंवा विश्वरचनेतील काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ शकतो.
या नक्षत्राने हिंदुस्थानात आणि ग्रीसमध्येही प्राचीन काळच्या खगोल अभ्यासकांना मोहात पाडलं. त्यांनी ते लक्षात ठेवण्यासाठी मनोरंजक कथाही रचल्या. यातील सर्व तारे एकाच प्रतलात (म्हणजे एकाच लेव्हलवर) आहेत असं पाहताना वाटलं तरी ते खरं नाही. त्यांचा एकूण आकार (पॅटर्न) तसा वाटला तरी ते परस्परांनासून भिन्न आणि बरेच दूर आहेत.
आपल्याकडचे विसाव्या शतकातले खगोल अभ्यासक पंडित महादेवशास्त्र्ााr जोशी यांनी सतत अवकाश निरीक्षण करून ‘नक्षत्रलोक’ नावाचे उत्तम पुस्तक लिहिले. यात नक्षत्राविषयीची आवड निर्माण व्हावी या हेतूने केवळ प्राथमिक माहिती दिली असल्याचं त्यांनीच प्रस्तावनेत म्हटलंय. मात्र नव्या अभ्यासकाला या पुस्तकाच्या वाचनातून नक्षत्रांची वेदकालापासूनची नोंद, कथा आणि ग्रीक कथाही समजतात. त्याचबरोबर विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जेवढी आधुनिक खगोलशास्त्र्ााrय माहिती होती, तीसुद्धा जाणून घेता येते. प्रासादिक शैलीतील या पुस्तकाविषयी पुन्हा केव्हातरी.
तर मूळ मुद्दा ‘मृगा’चा. खगोलशास्त्र्ााच्या नवख्या निरीक्षकाला हे नक्षत्र दाखवले तर रात्रभराचे आकाश न्याहाळण्याचं कुतूहल नक्कीच जागृत होईल. एकदा मला ऑस्ट्रेलिया आणि नॉर्वे या दोन देशांतल्या काही जणांना पेण येथील एका कार्यक्रमात ‘आकाशदर्शन’ घडविण्याची संधी लाभली. तासाभराचे आकाशदर्शन हा एकूण कार्यक्रमाचा छोटासा भाग होता आणि काळही असाच जानेवारी-फेब्रुवारीचा असल्याने संध्याकाळी ‘मृग’ ठसठशीतपणे अवकाशात चमकत होता.
आपल्या पारंपरिक कथेनुसार ‘मृग’ म्हणजे ‘हरीण’ हे अवकाशातील ‘उडते’ हरीण. दक्षिणेकडून उत्तरेकडे निघालेले दिसते, परंतु या प्रवासात कोणा ‘व्याधा’ने त्याची पारध केली. या हरणाचे मस्तक, चार पाय, शेपूट आणि त्याच्या शरीरात घुसलेला ‘बाण’ एवढे सारं ताऱयांच्या रूपात दिसतं आणि दूरवर तो व्याधसुद्धा (शिकारी) ठळकपणे दृष्टीस पडतो. ग्रीक कथेत मात्र आपण ज्याला हरीण म्हणतो त्याच तारकासमूहाला त्यांनी ‘व्याध’ किंवा शिकारी (हंटर) बनवलंय. गुडघ्यावर बसलेला हा शिकारी आणि त्याच्याबरोबरच्या श्वानाचा कंठमणी म्हणजे आपण म्हणतो तो व्याधाचा (सिरियस किंवा सायरस) स्पष्ट तारा.
थोडक्यात, नक्षत्र लक्षात ठेवण्यासाठी ही कथांची सोय. मात्र त्यामागचं विज्ञान काय ते थोडक्यात पाहू. प्रदीप नायक यांनी लिहिलेल्या ‘तारांगण’ या पुस्तकात त्याची समग्र वैज्ञानिक माहिती सोप्या शब्दांत दिली आहे. मृग तारकासमूहाने अवकाशातील 594 चौरस अंश एवढा भाग व्यापलेला असून त्यातले महत्त्वाचे तारे विश्वरचनेची माहिती स्पष्ट करतात.
त्यापैकी बिटलग्युज (किंवा बिटलज्युज) हा लालसर तार म्हणजे तार म्हणजे मृत्युपंथाला लागलेला लाल राक्षसी तारा आहे (रेड जायन्ट). त्याला मराठीत ‘काक्षी’ असं नाव आहे. त्याचा व्यास सूर्याच्या 550 पट (77 कोटी किलोमीटर) असून तो आपल्यापासून 428 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. त्याचप्रमाणे मृगातील राजन्य ताराही आकाराने प्रचंड असून त्याचा व्यास सूर्याच्या 50 पट आहे. हा एक जोडतारा (द्वैती) असून तो आपल्यापासून 243 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. ‘मृगा’च्या शेपटीत ‘एम-42 नावाचा विशाल तेजोमेघ दडलेला असून अशा तेजोमेघांमधूनच ताऱयांची निर्मिती होत असते. आपल्या नुसत्या डोळय़ांनी हे ‘शेपूट’ अतिशय स्पष्ट दिसते, पण मोठय़ा 8 इंच व्यासाच्या दुर्बिणीतून हा तेजोमेघ छान दिसतो. त्याचा व्यास 32 प्रकाशवर्षे म्हणजे सेकंदाला 3 लाख किलोमीटर वेगाने प्रकाशकण सलग 32 वर्षे प्रवास करून जेवढे अंतर कापतील तेवढा प्रचंड आहे.
हा तेजोमेघ आपल्यापासून 1600 प्रकाशवर्षे दूर असून त्याच्या गर्भातून 40 हजार वर्षांपूर्वी नव्या ताऱयांचा जन्म होऊ लागला. आपल्या सूर्यमालेसारख्या 20 हजार (!) सूर्यमाला या तेजोमेघात सामावू शकतील. 25 हजार वर्षांपूर्वी ‘थिटा-1’ या चार ताऱयांच्या ‘चुतष्का’चा जन्म याच तेजोमेघात झाला. ते प्रकाशमान होऊन काही काळाने चमकताना दिसतील. वेदकाळात या ‘मृगा’ला अग्रहायण म्हणत तर आपल्याकडे ग्रामीण भागात खाटलं-बाजलं म्हणून तो प्रसिद्ध आहे. मृगाचा वेध घेणारा व्याध मात्र ‘बृहल्लुब्धक’ तारकासमूहात असून (कॅनिसमेजर) असून तो रात्रीच्या आकाशातील सर्वात तेजस्वी तारा आहे. तेव्हा असे ‘मृग नक्षत्र’ शक्य होईल तेव्हा जरूर पहा.






























































