
इक्वेडोर देश सर्वोत्तम गुलाबांसाठी जगप्रसिद्ध आहे. विविध रंग, आकारांचे गुलाब ही तिथली खासीयत आहे. जगभरात इक्वेडोरची फुले जातात. त्याही पुढे एक पाऊल टाकत इक्वेडोरने खास गुलाबप्रेमींसाठी आगळेवेगळे गुलाब मार्केटमध्ये
आणले आहेत. ‘फॉरएव्हर रोझ’ असे त्यांना नाव देण्यात आले आहे. नावावरून लक्षात आलेच असेल की, हे गुलाब एक-दोन दिवसांत कोमेजून जाणारे नाहीत, तर दीर्घकाळ ताजे राहणारे आहेत. ‘फॉरएव्हर रोझ’ हे प्रिझर्व्ह गुलाब आहेत. त्याचे सौंदर्य आणि टवटवीतपणा वर्षभर तरी टिकून राहतो.
‘फॉरएव्हर रोझ’मध्ये गुलाबांच्या पाकळय़ा आणि रंग प्रिझर्व्ह केलेला आहे. या गुलाबांना सूर्यकिरण किंवा पाण्याची गरज लागत नाही. हे गुलाब वर्षभर टिकू शकतात. त्यामुळे ते चिरप्रेमाचे प्रतीक ठरले आहे.
फॉरएव्हर रोझ म्हणजे काय…
हे गुलाब वैविध्यपूर्ण रंगात उपलब्ध आहेत. लाल, सफेद, गुलाबी, पिवळा, याशिवाय मॅजेंटा, मारसाला आणि ऑरेंज, सोनेरी, आयवरी, वायलेटच्या विशिष्ट शैलीमध्ये आहेत. घर सजावट, लग्नसोहळा तसेच प्रियजनांना भेट देण्यासाठी हे गुलाब खास आहेत.
‘फॉरएव्हर रोझ’ ला हिंदुस्थानात
बाजारपेठ मिळावी, यासाठी इक्वेडोर सरकार प्रयत्नशील आहे. इक्वेडोर सरकारचा प्रो इक्वेडोर विभाग जगभरात हे उत्पादन पोहोचवत आहे.




























































