
>> अविनाश कुलकर्णी, व्यवसाय मार्गदर्शक आणि समुपदेशक
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी (आय.आय.एस.टी.) ही हिंदुस्थान सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ स्पेसअंतर्गत स्थापन झालेली आणि यूजीसी अॅक्ट 1956 अंतर्गत अभिमत विद्यापीठाचा दर्जा लाभलेली तिरुअनंतपुरम येथील एक स्वायत्त संस्था आहे. आपल्या देशात अवकाश संशोधनासाठी उच्च गुणवत्ता असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याच्या हेतूने स्थापन झालेली ही संस्था आहे.
अभ्यासक्रम ः या संस्थेत अवकाश संशोधनाशी संबंधित एरोस्पेस इंजिनीअरिंग, एव्हॉनिक्स, केमिस्ट्री, अर्थ अॅण्ड स्पेस सायन्स, हय़ूमॅनिटिज, मॅथमॅटिक्स व फिजिक्स अशा सात विभागांतर्गत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. चार वर्षांचा बी टेक (एरोस्पेस इंजिनीअरिंग किंवा एव्हॉनिक्स) तसेच पाच वर्षांचा डय़ूएल डिग्री प्रोग्रॅम (बी टेक आणि एम. एस्सी. किंवा एम टेक) असे दोन प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत. डय़ूयल डिग्री प्रोग्रॅम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर बी टेक या मुख्य पदवीसोबत एम. एस्सी.
अॅस्ट्रॉनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स,
सॉलिड स्टेट फिजिक्स, अर्थ सिस्टम सायन्स यांपैकी एक किंवा एम टेक ही पदवी बहाल करण्यात येते.
प्रवेश प्रक्रिया ः दरवर्षी ऑल इंडिया लेवलवर घेतल्या जाणाऱया ज्वॉइंट एन्ट्रान्स एक्जाम (अॅडव्हान्स) या परीक्षेतील गुणांकावर आधारित पदवी प्रवेश दिले जातात. उपलब्ध जागांची संख्या कमी असल्यामुळे उच्च गुणांकन मिळवणाऱया विद्यार्थ्यांनाच इथे प्रवेश मिळतो. मागील वर्षाच्या कट ऑफ मेरिटबाबत सर्व माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे. पेंद्र सरकारच्या आरक्षण धोरणानुसार सर्व आरक्षण लागू आहे. [email protected] या ई-मेलद्वारे प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती मिळवता येईल.
सुविधा – निवड झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना राहण्यासाठी वसतिगृह काही शुल्क आकारून उपलब्ध करून दिले जाते.
विविध शुल्क – प्रवेश फी, ग्रंथालय, वसतिगृह, भोजन यासाठी वर्षभरासाठी साधारणतः एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो, परंतु एससी, एसटी, ओबीसी, पीडी तसेच आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांसाठी शुल्क कमी असते.
भविष्याच्या संधी – संस्थेतून उत्तीर्ण होणारे बहुतांश विद्यार्थी सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ स्पेस किंवा अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) संशोधन कार्यासाठी घेतले जातात. अनेक देश-विदेशांतील खासगी कंपन्यादेखील या संस्थेच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करतात. माहिती पुस्तिकेतदेखील या संस्थेला भेटी दिलेल्या पंपन्यांचे तपशील मिळतात. https://www.iist.ac.in या वेबसाइटवर या संस्थेची सर्व माहिती आहे.



























































