लेख – महान क्रांतिकारक आणि महायोगी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्मिता अरविंद देशपांडे

महर्षी अरविंद हे महान तत्त्ववेत्ते, क्रांतिकारक आणि राष्ट्रभक्त होते.साधनांची शूचिता ही साध्याच्या श्रेष्ठतेवर अवलंबून असते, अशी श्रीअरविंद यांची धारणा असल्यामुळे त्यांची राजनीती समकालीन विचारवंतांहून भिन्न होती. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभागी राहिलेल्या योगी अरविंद यांनी नंतर अध्यात्मासाठी आयुष्य वेचले. त्यांची 150वी जयंती 15 ऑगस्ट रोजी झाली. त्यानिमित्त…

योगी श्रीअरविंद यांना हिंदुस्थानचे स्कातंत्र्य हवे होते ते आशियाच्या उत्थानासाठी. आशियाचे उत्थान हवे होते ते मानवजातीच्या कल्याणासाठी. देशाचे स्कातंत्र्य ही श्रीअरविंदांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय आवश्यकता होती. या त्यांच्या भूमिकेमुळे राजकारणाचा रथ प्रांतीयतेच्या, जातीयतेच्या किंवा पक्षांधतेच्या वर्दमात कधी रुतला नाही.

साधनांची शूचिता ही साध्याच्या श्रेष्ठतेवर अवलंबून असते, अशी श्रीअरविंद यांची धारणा असल्यामुळे त्यांची राजनीती समकालीन विंचारवंतांहून भिन्न होती. केवळ निःशस्त्र प्रतिकाराने हा देश मुक्त होईल याकर त्यांचा फारसा विश्वास नव्हता. प्रसंगी देशव्यापी सशस्त्र उठाव करावा हे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळे देशातील सर्व भूमिगत व सशस्त्र संघटनांशी त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध होता. मात्र, श्रीअरविंद यांना अभिप्रेत असणारी क्रांती हा क्षणिक भावनिक उद्रेक नव्हता. तीस वर्षांचा तो एक प्रदीर्घ कार्यक्रम होता. त्यासाठी शरीरबल, मनोबल, सैन्यबळ क शस्त्र्ाबल संगोपनाची आवश्यकता होती. त्यासाठी ते युवकांना प्रेरित करत होते.

1 एप्रिल 1908 च्या ‘वंदे मातरम्’ या अंकात हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याविषयी श्रीअरविंदांनी लिहिलेले आहे – The position of India makes her the key of Asia. Her freedom is necessary to the unity of Asia. From her alone can proceed a force of union, a starting point of comprehension, a reconciliation of Mahomedanism and Paganism.

श्रीअरविंदांना अभिप्रेत असलेल्या युवकांसाठी ‘माणिक तोळा उद्यान’ हे एक जागृत स्थान होते. त्यांचे धाकटे बंधू बारिन्द्र यांच्या नेतृत्काखाली तेथे एक संस्कार केंद्र चालवले जात होते. या केंद्रात वेगवेगळय़ा प्रकृतीची माणसं एकाच छत्राखाली एकत्रित झाली होती. माणिक तोळा बागेत श्रीअरविंदांचे गार्डन हाऊस होते. कोलकाताच्या मध्यवर्ती अशा भागात घोष कुटुंबांचा अनेक पिढय़ांचा हा बगिचा होता. नंतर आर्थिक हलाखीमुळे बागेचे रूपांतर पडीक जमिनीत झाले. पुढे गार्डनहाऊस नावाचे मध्यभागी असलेले घर तेवढे श्रीअरविंद यांच्या मालकीचे उरले होते. हे घर क्रांतिकारक बारिन्द्र आणि इतर क्रांतिकारक मंडळी भेटीगाठीसाठी, तयार केलेले बॉम्ब, शस्त्र्ाs, बंदुका लपविण्यासाठी वापरत होते. येथे सारे क्रांतिकारक लपूनछपून राहत असत. याचबरोबर या क्रांतिकारकांचे इतरही कार्यक्रम जसे ध्यानधारणा, गीतावाचन, क्रांतिकारी लिखाणाचे वाचन, गॅरिबाल्डी, मॅझिनी यांचे चरित्रवाचन, अध्यात्मावर चर्चा इत्यादी उपक्रम चालत असत. श्रीअरविंदांना बारिन्द्राच्या या उद्योगाची कल्पना होती. परंतु, ते त्यात प्रत्यक्षपणे गुंतलेले नव्हते.

क्रांतिकारकांचे एक तत्त्वज्ञान होते. जुलमी आणि अत्याचारी अधिकाऱयांची हत्या करून शासनात दहशत निर्माण करणे आणि प्रतिकार करून सामर्थ्य दाखवणे. त्याला अनुसरून 30 एप्रिल 1908 ला मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्डकर बॉम्ब टाकायचे ठरले. किंग्जफोर्ड हा निष्ठtर, जुलमी अधिकारी होता. क्रांतिकारकांचा वर्दनकाळ म्हणून तो प्रसिद्ध होता. प्रफुल्ल चाकी व खुदीराम बोस यांनी रात्री आठच्या सुमारास 30 एप्रिल रोजी मुजफ्फरनगरच्या क्लबमधून बाहेर पडणाऱया किंग्जफोर्डच्या घोडागाडीकर बॉम्ब टाकला. परंतु दुर्दैवाने किंग्जफोर्ड त्या गाडीत नव्हता. त्यामुळे तो काचला, मात्र दोन निरपराध स्त्रीयांचा बळी गेला. पोलिसांनी बॉम्बे फेकणाऱया तरुणांची शोधमोहीम सुरू केली. माणिक तोळा उद्यानावर धाड टाकून बारिन्द्र व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली. तिथे काही स्फोटके, बॉम्ब, दारूगोळा, रायफल्स, रिव्हाॅल्वर्स जमिनीत पुरलेली निघाली. या भागात एक तलाव होता. त्याचेही पाणी उपसून, गाळ काढून त्यास साफ केलं असता जुने पिस्तूल सापडले. त्यानंतर श्रीअरविंदांच्या निवासस्थानाची झडती झाली. त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर राहणारे शैलेंद्रनाथ बोस, अविनाश भट्टाचार्य यांनाही पकडण्यात आले. श्रीअरविंद यांना अलीपूरच्या तुरुंगात ठेवण्यात आले.

श्रीअरविंद दिवसभर योगसाधना, चिंतन करत असत. काही दिवसांनी त्यांना पुस्तके वाचण्यासाठी परवानगी दिली. या एका वर्षाच्या काळात अरविंद बाह्यजगापासून पूर्णपणे अलिप्त होते. या एकांतकासात ध्यानसाधना केली आणि त्यांना अंतरात्म्याचा ठाव गवसला. त्यांनी भगवद्गीतेचा सखोल अभ्यास केला. एकदा बंगालचे गव्हर्नर बेकर बोर्ड तेथे आले होते. अरविंद ध्यानस्थ होते. अर्धा तास काट पाहून निघून गेले. त्यांनाही अरविंदांच्या योगधारणेचे गूढ कळले नाही. अचंबित होऊन ते माघारी परत गेले. अरविंद शांत होते. कोर्टात गेल्यानंतरही अरविंद शांत, निश्चल, निरागस असत. श्रीअरविंदांना बॉम्ब प्रकरणात विनाकारण अटक झाली होती. सुटकेसाठी, खटला लढण्यासाठी आर्थिक बळ नव्हते. आर्थिक स्थिती हलाखीची होती. बहीण सरोजिनीने सर्क जनतेला, देशी-विदेशी लोकांना पत्रक काढून मदतीचे आवाहन केले. प्रसिद्ध वकील बॅ. चित्तरंजन दास यांनी श्रीअरविंदांची केस हाती घेतली. या खटल्याचा त्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला. बाकी मिळकतीवर पाणी सोडले. जकळचा पैसा खर्च करून, स्वत: ची घोडागाडी विकून खटला चालकिला. कर्षभर खटला चालला. सरकारी वकील म्हणून ऑर्डली नॉर्टन यांनी काम पाहिले. ‘मद्रासचा सिंह’ म्हणून ख्याती असलेले ते अत्यंत धूर्त म्हणून प्रसिद्ध होते.

साऱया देशाचे या खटल्याकडे लक्ष लागले होते. शेकटी आठ दिवस चित्तरंजन दास यांनी श्रीअरविंद यांची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली. शेवटच्या भाषणात त्यांनी मांडलेला मुद्देसूद युक्तिवाद प्रभावी ठरला. नॉर्टनसारख्या वकिलाचा त्यांच्यासमोर निभाव लागला नाही. त्याकाळी हा खटला अलौकिक ठरला. युक्तिवादात ते म्हणाले, ‘अरविंद हे अतिरेकी नसून वेदान्ती राष्ट्रवादी आहेत आणि एक दिवस ही चळकळ संपेल, क्षोभ शमेल; परंतु, त्यांच्या मृत्यूनंतरही मातृभूमीची स्तुती गाणारा महाकवी, महान उपदेशक, मानवतेचा प्रेमी म्हणून त्यांचे स्मरण चिरकाल होईल. त्यांचे शब्द हिंदुस्थानात आणि सप्तसागराच्या पार देशोदेशी निनादत राहतील.’

बॅ. चित्तरंजन दास यांच्या उचित युक्तिवादाची फलश्रुती म्हणून की काय, 14 ज्युरींनी एकमताने पुराव्याअभावी श्रीअरविंदांची निर्दोष मुक्तता केली. पुढे सुटकेनंतर उत्तरपारा येथे श्रीअरविंदांनी भाषण केले – ते म्हणाले, ‘एका वर्षाच्या कठोर साधनेमुळे मला श्रीकृष्णाचे दर्शन झाले. ब्रिटिश सरकारला काय मिळाले माहीत नाही; परंतु मला मात्र तुरुंगात श्रीकृष्ण भेटला. खटला सुरू असताना मला अवतीभवती, जिकडे तिकडे कैद्यांमध्ये, वकिलामध्ये, मॅजिस्ट्रेटमध्ये फक्त वासुदेव आणि वासुदेवच दिसत होता!’, ‘वासुदेव सर्वमितीः’ … हा श्रेष्ठ साक्षात्कार त्यांना झाला.

एक क्रांतिकारक तुरुंगात अडकवला गेला, पण बाहेर येताना जगाला वेगळे तत्त्कज्ञान सांगणारा आणि समस्त मानवजातीला वेगळय़ा उन्नत मार्गाकडे नेणारा योगी, युगपुरुष, महायोगी म्हणूनच बाहेर पडला. अलीपूरची ती कोठडी धन्य झाली!