आर्टिलरी स्कूलच्या फायरिंग रेंजवर युद्धभूमीचा थरार; तोफा, रॉकेट,मिसाईल, हेलिकॉप्टर्सचा सहभाग

666
tof gola

देवळाली येथील आर्टिलरी स्कूलच्या फायरिंग रेंजवर मंगळवारी ‘तोपची’ या फायर पॉवर प्रदर्शनाद्वारे हिंदुस्थानी सैन्य दलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडविण्यात आले. धडाडणाऱया तोफा, अचूक लक्ष्य भेदणारे रॉकेट्स, तोफगोळ्यांनी उजळून निघणारा आसमंत…. यामुळे युद्धभूमी अवतरली होती. शत्रूंना धडकी भरविणाऱया अत्याधुनिक उपकरणांमुळे सैन्य दलाची वाढलेली ताकद यावेळी अधोरेखित झाली.

‘तोपची’ हे सैन्य दलाचे दरवर्षी सादर होणारे फायर पॉवर प्रदर्शन आहे. देवळाली येथील आर्टिलरी स्कूलच्या फायरिंग रेंजवर मंगळवारी ‘तोपची’मध्ये 155 एमएम बोफोर्स, 120 एमएम मॉर्टर, अत्याधुनिक अल्ट्रालाईट होवित्झर एम-777, स्वयंचलित के-9 वज्र या तोफांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तोफांसोबतच रॉकेट्स, मिसाईल, लक्ष्यप्राप्ती रडार, मनुष्यरहीत विमान ही अत्याधुनिक उपकरणेही प्रदर्शित करण्यात आली.

नेपाळ लष्कराच्या शिष्टमंडळाने तोपची प्रदर्शनाला हजेरी लावून हिंदुस्थानी सैन्य दलाचे सामर्थ्य अनुभवले. याप्रसंगी साऊथर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल दीपेंदर सिंह आहुजा, आर्टिलरी स्कूलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल आर. एस. सलारीया, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या