वर्ल्डकप फिव्हर, रत्नागिरीतील कलाकाराने खडूत कोरला विश्वचषक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

सध्या आयसीसी विश्वचषक क्रिकेटचा फिव्हर आहे. क्रिकेटचा सामना पहाताना क्रिकेटपटूंचे हात तर शिवशिवतात, त्याबरोबर कलाकारांवरही क्रिकेट फिव्हरचा असर दिसतो. रत्नागिरीतील एका कलाशिक्षकाने दोन सेमी उंचीच्या खडूमध्ये क्रिकेट विश्वचषक कोरला आहे.

रत्नागिरीतील अविष्कार संस्थेतील कला शिक्षक दिप्तेश पाटील यांना सुक्ष्म वस्तूंवर कोरीव काम करण्याची खूप आवड आहे. दिप्तेश यांनी यापूर्वी खडूवर आणि तूरडाळीवर गणपतीची मूर्ती कोरली आहे. सध्या आयसीसी विश्वचषक सुरु असल्यामुळे दिप्तेश यांच्या डोक्यात क्रिकेटचा फिव्हर होता. विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्तानाने पहिले दोन सामने दणदणीत जिंकल्यामुळे देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीं हिंदुस्तान विश्वचषक जिंकू दे अशी प्रार्थना करत असताना दिप्तेश पाटील यांनी खडूवर अडीच तास कोरीव काम करत आयसीसी विश्वचषकाची प्रतिकृती तयार केली. दिप्तेश पाटील यांनी विश्वचषकाची प्रतिकृती तयार करून टिम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.