ऑक्सिजनअभावी 4 रात्रीत तब्बल 75 रुग्णांचा गोमेकॉ रुग्णालयात बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यातील गोमेकॉ रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 75 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे गोवा सरकारचा अक्षम्य गलथानपणा उघड झाला असून लोकांचा सरकारवरील विश्वास उडाला आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.

रात्री 1 ते पहाटे 6 वाजेपर्यंत गोमेकॉ रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्यात खंड पडतो आणि त्यामुळे रुग्ण दगावतात. ही परिस्थिती सुधारावी यासाठी आता उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सरदेसाई यांनी सांगितले की, या सहा तासांच्या कालावधीत 10 मे रोजी 26, 11 मे रोजी 21, 12 मे रोजी 15 तर 13 मे रोजी 13 रुग्ण दगावले. ही परिस्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागणे ही दुर्दैवाची बाब असून सध्या हे राज्य चालवायला हे सरकार अकार्यक्षम असून राज्याचा कारभार आता उच्च न्यायालयानेच चालवावा, अशी लोकांची भावना विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.