गद्दार मिंधेंच्या भाषणावेळी नेहमीप्रमाणे सर्व भाडोत्रींनी पळ काढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापुरातील ‘गद्दारां’च्या महाअधिवेशनात आज चांगलाच महापोपट झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाषण सुरू असताना जमविण्यात आलेल्या भाडोत्री गर्दीने गांधी मैदानातून नेहमीप्रमाणे पळ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाला असून, ‘गद्दारांना जनतेने धडा शिकविला’, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

कोल्हापूर शहरात दोन दिवसांचे ‘गद्दारां’चे अधिवेशन पार पडले. गद्दारांनी याला महाअधिवेशन म्हटले. परंतु, लोकांनी त्यांच्या या महाअधिवेशनाकडे सपशेल पाठ फिरविली. आज मिंधे गटाच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने या अधिवेशनाचा समारोप गांधी मैदान येथील सभेने झाला. यावेळी मोठय़ा प्रमाणावर कोल्हापूर आणि परिसरातून भाडोत्री लोक आणले होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे भाषणासाठी उभे राहताच या भाडोत्री गर्दीने पळ काढला. लोक निघून जातानाचा आणि रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, यापूर्वीही अनेकदा मुंबई, नगर, छत्रपती संभाजीनगर, विदर्भ आदी भागात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी लोक सभास्थानाहून निघून गेल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे.