अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली असून कोरोनाचा अहवाल प्राप्त होताच त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक अर्धवट सोडून जाण्याचा निर्णय घेतला. अशोक चव्हाण यांना पहिल्या लाटेत कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना नांदेडहून मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच त्यांना आपण पॉझिटिव्ह आल्याचे कळले. त्यानंतर तातडीने त्यांनी बैठक अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला.