सिंधू, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूला उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला आहे. तिला कोरियाच्या ऍन सी यंगकडून 21-18, 5-21, 9-21 असा पराभव पत्करावा लागला. तसेच पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉयलादेखील पराभवाचा सामना करावा लागला.

उपांत्यपूर्व फेरीच्या आधी सिंधूने हान युईचा 33 मिनिटांत 21-12, 21-15 असा सहज पराभव केला होता. प्रणॉयला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या कांता त्सुनेयामाकडून पराभव पत्करावा लागला. प्रणॉय या सामन्यात 11-21, 9-13 असा पिछाडीवर होता, जेव्हा त्याने दुखापतीमुळे सामना मध्येच सोडला.