
आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे याने रविवारी झालेल्या तीन हजार मीटरच्या अडथळा शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं आहे.
#AsianGames2023: Athlete Avinash Sable wins gold medal in Men’s 3000 meters Steeplechase. pic.twitter.com/VYtdUNA0k4
— ANI (@ANI) October 1, 2023
आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंकडून सुवर्णपदकांची लयलूट सुरुच आहे. रविवारी सांघिक ट्रॅप शूटिंग क्रीडाप्रकारात सुवर्णपदक जिंकले. पृथ्वीराज, के. चेनाई आणि जोरावर सिंग यांनी ही कामगिरी केली. यंदाच्या स्पर्धेतील हिंदुस्थानचे हे अकरावे सुवर्णपदक असून यातील सात सुवर्णपदकं नेमबाजीत आली आहेत.
























































