
हरयाणाच्या तुरुंगात आता मणिपूर आणि आसाममध्ये घडलेल्या हिंसाचारातील आरोपींना ठेवण्यात येत आहे. यात दगडफेक करणाऱ्या आरोपींची संख्या मोठी आहे. त्यांना विविध ठिकाणी तुरुंगात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. राज्य सरकारांच्या परवानगीने या आरोपींना ठेवण्यात आले आहे. यापूर्वी जम्मू-कश्मीरातील हिंसाचारातील आरोपींनाही हरयाणाच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते.