निवडणुकांदरम्यान काँग्रेसच्या 170 हून अधिक आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
congress

निवडणुकांच्या काळात भाजपमध्ये अन्य पक्षांतील आमदारांची घाऊक भरती केली जाते. देशभरात अशा 182 आमदारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्याचा अहवालच समोर आला आहे. काँग्रेसच्या 5-10 नव्हे तर तब्बल 170 आमदारांनी याच काळात पक्ष बदलल्याचा अहवाल ‘पोल राइटस् असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्मस्’ने (एडीआर) दिला आहे.

‘एडीआर’ने दिलेल्या अहवालानुसार 2016 ते 2020 या कालावधीत निवडणुका लढविणाऱया 405 आमदारांपैकी 182 आमदारांनी भाजपमध्ये, 38 आमदारांनी काँग्रेसमध्ये तर 25 आमदारांनी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) मध्ये प्रवेश केला आहे. आमदारांनी पक्ष बदलल्याने गोवा, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर येथील सरकार पडल्याचे या अहवालात म्हटले आहे.

काँग्रेसच्या 7 राज्यसभा खासदारांनी बदलला पक्ष

‘एडीआर’च्या रिपोर्टनुसार 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या पाच लोकसभा सदस्यांनी अन्य पक्षात सामील होण्यासाठी भाजप सोडली. त्याचप्रमाणे 2016 ते 20 च्या काळात राज्यसभेवरील निवडीसाठी सात खासदारांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. राज्यसभेच्या 16 खासदारांपैकी 10 खासदार भाजपमध्ये सामील झाले आहेत.