एटीएममधून मिळणार गरमागरम बिर्याणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गरमागरम बिर्याणी म्हटलं की, तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. हिंदुस्थानी लोकांचे बिर्याणी प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. झोमॅटो, स्विगीसारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक ऑर्डर बिर्याणीची दिली जाते. लोकांचे हे बिर्याणी प्रेम पाहता चेन्नईत चक्क बिर्याणीसाठी एटीएम मशीन सुरू करण्यात आले आहे. चेन्नईमधील कोलाथूर या ठिकाणी हे अनोखे एटीएम सुरू करण्यात आले आहे. या एटीएम मशीनमध्ये तब्बल 30 प्रकारच्या व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी मिळतात. एटीएममधून आपण पैसे काढतो अगदी त्याचप्रमाणे एटीएमच्या स्क्रीनवर उपलब्ध असलेली लिस्ट पाहून आपण आपली आवडती बिर्याणी निवडू शकतो. सध्या हे मशीन प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आले असून लवकरच हे मशीन देशाच्या इतर भागांतही पाहायला मिळेल.