
पाकिस्तानच्या ‘हनी ट्रप’मध्ये अडकलेला हिंदुस्थानच्या ‘डीआरडीओ’ विभागातील शास्त्र्ाज्ञ विदेशात जाऊन ‘पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह’च्या (पीआयओ) हस्तकाला भेटल्याचा संशय पुणे ‘एटीएस’ने व्यक्त केला आहे. गोपनीय माहिती पाकडय़ांना पुरविल्याप्रकरणी पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या शास्त्र्ाज्ञाकडे केलेल्या चौकशीत आणखी काही माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.
प्रदीप मोरेश्वर कुरुलकर (59, रेसिडेन्शियल कॉलनी, दिघी; मूळ रा. शिक्षकनगर, कोथरूड) असे अटक केलेल्या शास्त्र्ाज्ञाचे नाव आहे. याबाबत ‘डीआरडीओ’च्या दिल्ली मुख्यालयातील व्हिजिलन्स अॅण्ड सिक्युरिटी विभागाचे ऑडिशनल डायरेक्टर यांनी मुंबई येथील काळाचौकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 13 डिसेंबर 2022 ते 24 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला आहे.
कुरुलकर हा डीआरडीओच्या दिघी येथे ‘रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (इंजिनीअर्स)’ आणि पाषाण येथील ‘ऑफिस ऑफ अर्मामेंट अॅण्ड कॉम्बॅक्ट इंजिनीअरिंग’ (एसीई) येथे कार्यरत होता. ‘पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह’च्या हस्तकाशी व्हॉट्सअॅप व्हॉईस मेसेज, व्हिडीओ कॉलने तो संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे.
संशयास्पद हालचालींवरून त्याला अटक केली होती. त्यातच आता कुरुलकर याने विदेशवारी केल्याने तो ‘पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह’च्या ( पीआयओ) हस्तकाला भेटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रदीप कुरुलकर हा ‘डीआरडीओ’च्या संचालकपदावर असताना तो पाकिस्तानच्या ‘पीआयओ’च्या संपका&त होता. त्याने पीआयओला व्हॉट्सअॅपमधील मेसेजेस, व्हॉइस व व्हिडीओ कॉलद्वारे गोपनीय माहिती दिल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, गोपनीय माहिती पुरविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा उपयोग झाला ती उपकरणे जप्त करायची आहेत. त्याने गोपनीय माहिती आर्थिक फायद्यासाठी पुरविली का? नेमकी कोणती माहिती पीआयओला पुरविली? याचा तपास ‘एटीएस’कडून सुरू आहे.

























































