एटीएसकडून संशयिताच्या सोशल मीडियाचा धांडोळा, फेसबुकसह व्हॉटसअ‍ॅप संपर्कातील काहीजणर रडारवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लष्कर ए तोयबा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याप्रकरणी एटीएसने अटक केलेल्या मोहम्मंद जुनैद मोहम्मंद याच्या पाच फेसबुक खात्यांची इंत्भूंत माहिती घेतली जात आहे. त्याने कोणाकोणाला मेसेज केला आहे, व्हॉटसअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून किती जणांशी संपर्क केला आहे, याचीही तपासणी केला जात आहे.

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी मोहम्मंद जुनैद मोहम्मद अता मोहम्मद (वय 28) याला अटक केली. त्याला न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जुनैदने वेगवेगळ्या मोबाईलवरून पाच फेसबुक खाती वापरली आहेत. त्यामाध्यमातून तो देशविरोधी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे, मुस्लिम समाजातील तरूणांची माथी भडकविणे, लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेत भरती करण्यासाठी तरूणांना प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे. त्यामुळे एटीएसकडून त्याच्या फेसबुकची संपुर्ण माहिती घेतली जात आहे. फेसबुकद्वारे तो दहशतवादी संघटनेच्या काही साथीदारांसोबत संपर्कात होता.

सोशल मीडियाची तपासणी

मोहम्मंद जुनैदचा व्हॉट्सगुपही होता. त्याचीही माहिती एटीएस पथकाकडून घेतली जात आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो कोणासोबत सातत्याने संपर्कात होता. त्यांच्यासोबत काय संवाद झाला आहे. पुण्यासह राज्यातील कोणकोणत्या भागांची रेकी केली आहे, त्याचे पुरावे सोशल मीडियाद्वारे कोणाला पाठविले आहेत, का याबाबतची माहिती घेतली जात आहे.