अहिल्यानगरमध्ये उमेदवाराचे स्टेटस ठेवल्याने हल्ला

एका तरुणाने सोशल मीडियावर एका उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी स्टेटस ठेवल्याने त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून डोक्यात चॉपरने हल्ला केल्याची घटना अहिल्यानगरमधील मुकुंदनगर परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी सहा ते सात जणांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्रार मुक्तार शेख हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या जबाबावरून पोलिसांनी आसीर शेख, अस्लम आसीर शेख या दोघांसह चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.