अभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला

लग्नास नकार दिल्याने अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर अंधेरी येथे चाकूहल्ला झाल्याची घटना घडली. कॅफेमधून आपल्या घरी परतत असताना वर्सोवा येथे योगेश महिपाल सिंग याने मालकीची कार अडकून तिला खाली उतरवले आणि चाकूचे वार केले.

योगेश हा लग्नासाठी मालवीच्या मागे लागला होता. गेले काही दिवस ती त्याचा फोन उचलत नव्हती. त्याबद्दल विचारणा करण्यासाठीच योगेशने रात्री नऊच्या सुमारास वर्सोका येथे तिला रस्त्यातच गाठले. दोघांमध्ये वाद झाला आणि योगेशने आपल्याजकळील चाकूने तिच्या पोटावर तसेच दोन्ही हातावर वार करून पळ काढला. मालवीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या