AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला

छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर आली आहे. या घंटेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यावेळी वाहनात इम्तियाज जलील पुढच्या सीटवर बसले होते. एमआयएम पक्षातील नाराज गटाकडून हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

या हल्ल्यात इम्तियाज जलील यांच्या वाहनात मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाली आहे, अशी महती समोर आली आहे. प्रचार रॅलीच्या दरम्यान बायजीपुरा जिन्सी भागात ही घटना घडली आहे. एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी आहे. पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत.