
ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज हिंदुस्थानात त्यांची नेक्स्ट-जनरेशन ऑडी Q7 च्या बुकिंग्जच्या शुभारंभाची घोषणा केली. नवीन ऑडी Q7 मध्ये कार्यक्षमता, स्टाइल, आरामदायीपणा व ड्रायव्हिंग क्षमतेचे परिपूर्ण संयोजन आहे. नवीन शक्तिशाली 3.0 लिटर V6 टीएफएसआय पेट्रोल इंजिन, जे निर्माण करते 340 एचपी शक्ती, 500 एनएम टॉर्क आणि फक्त 5.9 सेकंदांमध्ये प्रतितास 0 ते 100 किमी गती प्राप्त करते. ऑडी Q7 500,000 रूपये इतक्या सुरूवातीच्या बुकिंग रक्कमेमध्ये बुक करता येऊ शकते.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “2021 मध्ये नऊ उत्पादने लाँच केल्यानंतर आम्ही आणखी एक अविश्वसनीय ऑफरिंग – दिग्गज ऑडी Q7 सह नववर्षात प्रवेश करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आजपासून या कारच्या बुकिंग्जचा शुभारंभ करत आहोत. ऑडी Q7 रस्त्यावरील दिमाखदार उपस्थिती आणि ऑन-रोड व ऑफ-रोड वैविध्यपूर्ण कार्यक्षमतेमुळे ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. ऑडी Q7 च्या माध्यमातून आम्ही नवीन डिझाइन व वैशिष्ट्यांसह या स्तराला अधिक उंचावर नेत आहोत. मला विश्वास आहे की, ऑडी Q7 ऑडी समूहामध्ये सामील होण्याची इच्छा असलेल्या विद्यमान व भावी ग्राहकांमध्ये लोकप्रिय राहिल.”
ऑडी Q7 मध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत- जसे अॅडप्टिव्ह एअर सस्पेंशन, ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट, क्वॉट्रो ऑल-व्हिल ड्राइव्ह, जे उच्च दर्जाची ड्रायव्हिंग क्षमता व हाताळणीमध्ये साह्य करते. ड्रायव्हरला साह्य करणारी वैशिष्ट्ये आहेत- पार्क असिस्ट प्लससह 360-डिग्री-व्ह्यू कॅमेरा आणि लेन डिपार्चर वॉर्निंग. मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प्स व रिअर एलईडी टेल लॅम्प्सच्या माध्यमातून अपवादात्मक लायटिंग परफॉर्मन्सची खात्री मिळते. तसेच पुढील व मागील बाजूस डायनॅमिक टर्न इंडिकेटर्स आहेत. आरामदायी वैशिष्ट्यांमध्ये 4-झोन एअर कंडिशनिंग, एअर आयनोझर व अरोमाटायझेशन, कॉन्टर अॅम्बियण्ट लायटिंगसह 30 रंग, बीअॅण्डओ प्रिमिअम 3डी साऊंड सिस्टिम यांचा समावेश असण्यासह इतर सर्वोत्तम वैशिष्ट्ये देखील आहेत.

























































