
ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये 13 ऑगस्टपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेली सुरुवात होणार आहे. या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या कामगिरीवर चाहत्यांच्या नजरा असणार आहे. कारण मिचेल स्टार्क हिंदुस्थानचे दिग्गज माजी कर्णधार कपिल देव यांचा सर्वाधिक विकेट्स्चा विक्रम मोडीत काढण्यापासून केवळ एक विकेट दूर आहे. सध्या 105 कसोटी सामन्यांमध्ये मिचेल स्टार्कच्या नावावर 433 विकेट्स आहेत. तर, कपिल देव यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये 434 विकेट्स घेतल्या आहेत.
जरी स्टार्क विकेट्सच्या बाबतीत कपिल देव यांच्या पुढे जात असला, तरी एका डावात पाच विकेट्स घेण्याच्या (फाइव्ह-विकेट हॉल) बाबतीत कपिल पाजी बऱ्याच पुढे आहेत. कपिल देव यांनी आपल्या कारकिर्दीत 23 वेळा हा पराक्रम केला आहे, तर स्टार्कच्या नावावर सध्या 18 फाइव्ह-विकेट हॉल आहेत. याशिवाय, कपिल देव यांनी 1060 मेडन ओव्हर टाकल्या आहेत, तर स्टार्कने आतापर्यंत 622 मेडन ओव्हर फेकल्या आहेत, जे फलंदाजांवर सतत दबाव राखण्याची कपिल यांची हातोटी दर्शवते.
ODI World Cup 2027 खेळण्यासाठी पात्रता फेरीची अग्नीपरिक्षा, ICC ने केली तारखांची घोषणा
कपिल देव यांची केवळ गोलंदाजीच्या आकडेवारीवरून तुलना करता येणार नाही, कारण ते कसोटी इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडू मानले जातात. त्यांनी 434 विकेट्स घेण्यासोबतच 5,248 धावा केल्या आहेत. याच्या तुलनेत स्टार्क एक उपयुक्त गोलंदाज आणि फलंदाज असला, तरी फलंदाजीच्या बाबतीत तो कपिल देव यांच्या आसपासही पोहोचत नाही.





























































