औसा-तुळजापूर रस्त्यावरील आशीव टोलनाक्यावर तीन ट्रक चालकांना लुटले, तिघांविरुध्द गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औसा-तुळजापूर रस्त्यावरील आशीव येथील टोलनाक्यावर थांबलेल्या ट्रक चालकांना तिघा अज्ञात व्यक्तींनी लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्मपाल ओमप्रकाश पाल (रा. पनवेल) याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तो टी.एन.20 टी.आर. 3724 हे वाहन घेऊन चेन्नईवरुन आलेला होता. त्याच्यासोबत एम.पी.20 एच.व्ही. 5387 हे वाहन घेऊन महिंद्रसिंग हा पण होता. आशीव येथील टोलनाक्याजवळ गाडी कडेला घेऊन ते थांबले होते. तिथून निघत असताना अचानक तिघे त्यांच्याकडे आले त्यांनी जबरदस्तीने गाडीची चावी हिसकाऊन घेतली. दगडाने कपाळावर मारुन जखमी केले. खिशातील 7500 रुपये काढून घेतले.

महिंद्रसिंग याच्याही गाडीची चावी घेऊन त्याच्या जवळील रोख 20 हजार रुपये, एक मोबाईल किंमत 5 हजार, कपड्यांची बॅग तसेच रणवीरसिंग याच्या गाडीमध्ये शिरुन त्याच्याजवळील रोख 9 हजार असा सुमारे 41,500 रुपयांचा ऐवज लूटून नेला. तसेच गाडीची काच फोडून 3500 रुपयांचे नुकसान केले.

या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.