
BCCI ने हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात बदल जाहीर केला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार मालिकेतील तिसरा सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार होता, मात्र आता हा सामना इंदूर येथे खेळवण्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. BCCIने सोमवारी सकाळी प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली. हा सामना 1 ते 5 जानेवारी दरम्यान खेळवला जाणार आहे.
बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात लिहिले की ‘हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील तिसरा कसोटी सामना, 1 ते 5 मार्च दरम्यान एचपीसीए स्टेडियम, धरमशाला येथे होणार होता, तो आता होळकर स्टेडियम, इंदूर येथे खेळवण्यात येणार आहे. धरमशाला येथे कडाक्याची थंडी असल्यामुळे, आउटफिल्डमध्ये पुरेसे गवत नाही त्यामुळे हे मैदान खेळण्यासाठी पूर्ण तयार होण्यास थोडा वेळ लागेल.’
हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
दुसरी कसोटी – 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी – 1 ते 5 मार्च, इंदूर
चौथी कसोटी – 9 ते 13 मार्च, अहमदाबाद



























































