ऑस्ट्रियाच्या शाळेत विद्यार्थ्याचा अंदाधुंद गोळीबार

ऑस्ट्रियाच्या ग्राझ शहरातील शाळेत मंगळवारी सकाळी एका विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केल्याने प्रचंड खळबळ उडाली. हल्लेखोर विद्यार्थ्याने दोन वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षकांवर गोळ्या झाडल्या. त्यात 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर 28 जण जखमी आहेत. त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण ग्राझ शहरात तणावाचे वातावरण आहे.यापूर्वी 20 जून 2015 रोजी ग्राझ शहर गोळीबाराने हादरले होते. त्यात तिघांचा मृत्यू झाला होता. त्या गोळीबाराला दहा वर्षे पूर्ण होत असतानाच मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास बोर्ग ड्रेयर्सचुत्झेंगासे शाळेत अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. शाळेतील गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने घबराट पसरली.