
देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी Maruti Suzuki ने हिंदुस्थानात आपली लोकप्रिय Swift नवीन अवतारात लॉन्च केली आहे. अतिशय आकर्षक लूक आणि मजबूत इंजिन क्षमतेने सुशोभित या कारची किंमत 5.73 लाख रुपये ते 8.41 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान ठेवण्यात आली आहे. कंपनीने या कारमध्ये काही बदल केले आहेत. जे या कारला कंपनीच्या आधीच्या मॉडेलपेक्षा वेगळं करतात. आज आपण या बद्दलच अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
Maruti Swift कंपनीने LXI, VXI, ZXI, ZXI+ आणि ZXI+ या पाच व्हेरिएंटमध्ये ही कार लॉन्च केली आहे. कंपनीने या कारच्या टॉप व्हेरिएंटमध्ये ड्युअल टोन पेंट स्कीमचा समावेश केला आहे, जो या कारला स्पोर्टी लूक देतो.
ही कार Maruti Swift चा नवीन फेसलिफ्ट मॉडेल आहे. कंपनीने या कारच्या इंटिरियर आणि इंजिनमध्ये बदल केले आहेत. नवीन Maruti Swift च्या समोरील बाजूस कंपनीने क्रोम स्ट्रिपसह सिंगल पीस ग्रिल दिली आहे. या व्यतिरिक्त या कारला ब्लॅक छप्पर आणि नवीन डिझाइन केलेले अॅलोय व्हील देण्यात आले आहे.
नवीन Maruti Swift मध्ये कंपनीने 1.2 लीटर क्षमतेचे नवीन शक्तिशाली K12N पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 90bhp ची पॉवर आणि 113Nm चा टॉर्क जनरेट करते. या कारचे मॅन्युअल व्हेरिएंट 23.20 kmpl चे मायलेज आणि 23.76 kmpl चे AGS ट्रांसमिशन व्हेरिएंट देते, असा कंपनीने दावा केला आहे.



























































