‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, मोठ्या कुटुंबासाठी आहे बेस्ट पर्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी ऑटोबाजारात अशा अनेक कार आहेत, ज्या एका मोठ्या कुटुंबासाठी फिट आहेत. जर तुम्हीही आपल्या कुटुंबासाठी एखादी स्वस्त आणि स्टाईलिश गाडी खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला हिंदुस्थानात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त 7 सीटर कार बद्दल माहिती सांगणार आहोत.

Maruti Suzuki Eeco

गेल्या अनेक वर्षांपासून ही कार हिंदुस्थानी रस्त्यांवर राज्य करत आहे. ही एक प्रसिद्ध 7 सीटर कार आहे. यात 1.2- लिटर फोर सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 73 bhp पॉवर आणि 101 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे. जे लोक या कारपासून लांब पल्ल्याचा प्रवास करतात त्यांच्यासाठी कंपनी सीएनजी व्हेरिएंटचा पर्यायही देत आहे. या कारची किंमत 4.08 लाख रुपये आहे.

Datsun Go Plus

Datsun Go Plus मध्ये 1198 सीसीचे 3-सिलिंडर इन-लाइन 4 वाल्व डीओएचसी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग, ड्युअल फ्रंट एअरबॅगचा समावेश आहे. ही एक अतिशय लोकप्रिय कार आहे. या कारची किंमत 4,25,926 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

Renault ट्रिबेर

Renault Triber कार मध्ये 999cc चे 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 72 Ps पॉवर वर 96 Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये मल्टी पॉइंट इंधन इंजेक्शन देण्यात आले आहे. Renault Triber ही कार इलेक्ट्रिक ब्लू, मून लाईट सिल्वर आणि आईस कुल व्हाईट रंगात उपलब्ध आहे. ही सात सीटर कार आहे.

सेफ्टी फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये एयरबॅग-ड्रायव, पेसेंजर एयरबॅग, Load Limiter + Pretensioner, स्पीड अ‍ॅलर्ट वॉर्निंग असे अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहे.

या कारचा आकार लक्षात घेऊन कंपनीने याची लांबी 3990 मिमी, रुंदी 1739 मिमी, उंची 1643 मिमी, व्हील बेस 2636 मिमी, ग्राउंड क्लीयरन्स 182 मिमी, फ्रंट ट्रॅक 1547 मिमी ठेवली आहे. तसेच या कारमध्ये 40 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. Renault Triber ची एक्स-शोरूम किंमत 4.49 लाख रुपये इतकी आहे.