
हिंदुस्थानात बजेट फॅमिली कारची एक मोठी लिस्ट उपलब्ध आहे, जी तुमच्या खिशाला परवडू शकते. आपण या कार नियमित वापरात देखील चालवू शकता. आज आम्ही तुम्हाला हिंदुस्थानात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त फॅमिल कार बद्दल माहिती सांगणार आहोत.
Maruti Suzuki Celerio
Maruti Suzuki Celerio मध्ये 998cc इंजिन देण्यात आले आहे. जे 6000 Rpm वर 50 kw पॉवर आणि 3500 Rpm वर 90 Nm टॉर्क जनरेट करते. मायलेज बद्दल बोलायचं झालं तर पेट्रोल व्हेरियंटमध्ये ही कार 23.10 किमीचा मायलेज देते. तर सीएनजी व्हेरियंटमध्ये 31.76 किमीचा मायलेज देते. तसेच यामध्ये 5 जणांची आसन क्षमता आहे. यात 35 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे.
किंमत
Maruti Suzuki Celerio ची एक्स शोरूम किंमत ही 4,31,289 इतकी आहे.
Maruti Suzuki Alto
कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची Maruti Suzuki Alto ही देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. यामध्ये 796 सीसीचे 3 सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 6000 Rpm वर 30.1 kw पॉवर आणि 3500 Rpm वर 60 Nm टॉर्क जनरेट करते.
किंमत
या कारची किंमत 2,94,800 रुपये इतकी आहे. ही कार 32.99 किमी प्रति किलो सीएनजी मायलेज देऊ शकते.
Maruti S-Presso
Maruti Suzuki S Presso मध्ये 998 सीसीचे BS VI इंजिन देण्यात आले आहे. जे 5500Rpm वर 50kw ची पॉवर आणि 3500Rpm वर 90Nm टॉर्क जनरेट करतो. तसेच ट्रान्समिशनसाठी या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन आणि एजीएस आहेत. Maruti Suzuki S Presso चे VXi MT, VXi MT, VXi AGS आणि VXi+ AGS व्हेरियंट प्रति लिटर 21.7 चा मायलेज देणार असा दावा कंपनीने केला आहे. या कारमध्ये 27 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे.
किंमत
याची एक्स शोरूम किंमत 3.70 लाख रुपयांपासून सुरु होऊन 5.70 लाख रुपयांपर्यंत आहे.



























































