Ferrari Roma कुपे स्पोर्ट्स कार हिंदुस्थानात लॉन्च, जबरदस्त फीचरसह 320kmph ची टॉप स्पीड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इटलीची आघाडीची वाहन निर्माता Ferrari ने हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन कूप स्पोर्ट्स कार Roma नवीन अवतार लॉन्च केली आहे. अतिशय आकर्षक लूक आणि दमदार इंजिनने सुशोभित या कारची प्रारंभिक किंमत 76.7676 कोटी रुपये (एक्स-शोरूम, पॅन इंडिया) इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीने या कारमध्ये काही खास बदल केले आहेत, जे मागील मॉडेलपेक्षा बरेच चांगले आहेत.

कारच्या या नवीन मॉडेलमध्ये कंपनीने सुमारे 70 टक्के बदल केले आहेत. असं असलं तरी याची बहुतेक डिझाइन जुन्या मॉडेलसारखीच आहे. या कारमध्ये एलईडी हेडलॅम्पसह हॉरिजेंटल एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स देण्यात आल्या आहेत. यात फ्लेयर्ड व्हील सह तीन-मोड रिअर स्पॉलर देण्यात आले आहे. ज्यात लो ड्रॅग, मध्यम डाउनफोर्स आणि उच्च डाउनफोर्सचा समावेश आहे.

Ferrari Roma मध्ये कंपनीने 3.9 लिटर क्षमतेचे टर्बोचार्गेड व्ही 8 इंजिन देण्यात आले आहे. जे 612bhp ची पॉवर आणि 760Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 8-स्पीड ड्युअल क्लच ट्रांसमिशन गीअरबॉक्ससह येते. फक्त 3.4 सेकंदात ही कार 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाची गती प्रप्त करते. तसेच याची टॉप स्पीड 320 किमी प्रति तास इतकी आहे.