जुन्या कारची विक्री करून मिळू शकते चांगली किंमत, फॉलो करा ‘या’ टिप्स…

बर्‍याच वेळा लोक आपली जुनी कार विकताना घाई करतात. याचा परिणाम असा होतो की, जुन्या मोटारींची विक्री करताना त्याचा चांगला भाव मिळत नाही. आपली जुनी कार विकण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या जुन्या कारवर चांगली डील आणि किंमत मिळावी म्हणून काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ काय आहेत या टिप्स…

पेपरवर्क ठेवा पूर्ण

कार पेपरवर्कचे काम खूप महत्वाचे आहे. जेव्हा एखादा ग्राहक आपली जुनी कार खरेदी करतो, त्यावेळी ती व्यक्ती गाडीचे कागदपत्रे व्यवस्थित तपासते. जेणेकरून पुढे जाऊन कोणतीही अडचण येऊ नये. जर तुमच्या कारचे पेपरवर्क पूर्ण असेल तर तुम्ही कार विकताना योग्य डील करू शकाल.

वाहन सर्व्हिस रेकॉर्ड महत्वाचे आहे

आपण आपल्या कारचे सर्व्हिस रेकॉर्ड ठेवणे खूप महत्वाचे आहे. हे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही कार ग्राहकास सांगू शकता की आपण कारची वेळोवेळी सर्व्हिस केली आहे. सर्व्हिस रेकॉर्ड पाहून ग्राहक तुमची जुनी कार खरेदी करण्यासाठी चांगली किंमत देऊ शकतो.

Hero ची नवीन Electric Scooter लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावेल 210 किमी

इंटिरिअर ठेवा क्लीन

गाडी खरेदी करताना ग्राहक इतर सर्व गोष्टींसोबतच कारचे इंटिरिअरही तपासतो. जर आपल्या कारच्या आतील बाजूस कारचे सीट कव्हर खराब असेल, किंवा इतर काही भाग खराब असल्यास ग्राहक आपल्या कारला चांगला भाव देणार नाही. अशामध्ये तुम्ही तुमच्या कारचा इंटिरिअर क्लीन आणि व्यवस्थित ठेवा.

हे ही वाचा…

आपली प्रतिक्रिया द्या