
उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या आहारात बदल करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला थंडावा मिळून उष्णतेचे विकार होत नाहीत. सध्या ऋतुमानानुसार आहार न घेणे, वर्क फ्रॉम होम, खाण्यापिण्याचा चुकीच्या सवयी याचा शरीरावर परिणाम होतो. बैठ्या कामांमुळे काही वेळा सांधेदुखी होते. शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते तसेच उष्णतेचे विकार टाळण्यासाठी उन्हाळ्यात कोणती फळे खाणे आवश्यक आहे ते पाहूया.
संत्र्यात सायट्रिक अॅसिड असते. यामुळे शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण कमी व्हायला मदत होते. संत्र फळात जीवनसत्त्व सी तसेच डिटॉक्सीफाइंग गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील विषारी तत्त्व बाहेर टाकायला मदत होते.
केळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे युरिक अॅसिडचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी केळं खाणे आवश्यक आहे. केळं खाल्ल्याने शरीरातील युरिक अॅसिड बाहेर टाकणे आणि संधीवाताचा आजारही दूर होतो.
गाजरात जीवनसत्त्व ए आणि अँण्टऑक्सीडंटचा उत्तम स्त्रोत आहे. गाजर युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यास गुणकारी आहे. शरीरातील फ्री रेडिकल्स बरोबर लढण्याची ताकद गाजरामुळे मिळते. सांध्याचे दुखणे, सांध्यांना सूज येणे गाजर खाल्ल्याने कमी होते. सलाड, कोशिंबीर, भाजी अशा पदार्थांमध्ये गाजर वापरू शकता.
फळांचा राजा आंबा ऋतुमानानुसार उन्हाळ्यात मिळणारे फळ आहे. आंब्यामध्ये अँण्टऑक्सीडंट भरपूर प्रमाणात असतात. युरिक अॅसिडचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी आंबा खावा. शरीर स्थूल होणे हे शरीरात युरिक अॅसिड वाढण्याचे एक मुख्य कारण आहे. आंबा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

























































