
बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात एनडीएला स्पष्ट बहुमत प्राप्त होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानंतर आता ‘ऑक्सिस माय इंडिया’च्या एक्झिट पोलमधून बिहारमध्ये सत्तेसाठी मोठी चुरस पाहायला मिळू शकते.
या पोलनुसार एनडीएला 121 ते 141, तर महाआघाडीला 98 ते 118 जागा मिळतील असा अंदाज आहे. चर्चेत ठरलेला प्रशांत किशोर यांच्या जण सुराज्य पक्षाला कदाचित खतेही उघडता येणार नाही किंवा एखादी जागा मिळू शकते, असा अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरल्यास बिहार विधानसभेत त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते.





























































