अयोध्येत साडेतीन वर्षांत राममंदिर

अयोध्येत श्री रामाचे भव्य मंदिर बांधण्यासाठी सर्व भाविकांचे आर्थिक सहकार्य स्वीकारले जाईल. प्रस्तावित राममंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर साडेतीन वर्षांत ते तयार होईल, असे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी शनिवारी सांगितले. मंदिराचे बांधकाम कधी सुरू होईल याबाबतचा निर्णय नृपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेईल, असे, गोविंद देवगिरी महाराज यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या