मधुमेहावर आयुर्वेदिक औषधं ठरताहेत परिणामकारक, संशोधनाचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मधुमेह हा एक दुर्धर आजार आहे. काही काळापूर्वी वयाच्या साठीनंतर भेडसावणारा हा आजार आता ऐन तारुण्यातही जडू लागला आहे. बदलती जीवनशैली, आहारातील जंक फूडचे वाढलेले प्रमाण, व्यायामाचा अभाव हे घटक त्यात भर घालत आहेत. पण, अशा मधुमेहग्रस्तांसाठी एक आनंदाचे वृत्त आहे. एका संशोधन अहवालात मधुमेह आयुर्वेदिक औषधांनी नियंत्रित ठेवता येऊ शकतो, असा खुलासा करण्यात आला आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (सीएसआयआर)ने विकसित केलेल्या एका आयुर्वेदिक औषधांचा परिणाम टाईप-2 प्रकारच्या मधुमेहावर होत असल्याचं आढळून आलं आहे. या परिषदेने गुजरात, राजस्थान, बिहार या राज्यांमधील रुग्णांवर या औषधांचा वापर केल्यानंतरचे परिणाम अभ्यासले गेले. त्यात आयुर्वेदिक औषध बीजीआर-34 हे टाईप-2 प्रकारच्या मधुमेहावर अतिशय परिणामकारक असून या औषधांच्या जोडीला पथ्ये पाळल्याने मधुमेह नियंत्रित झाला आहे, असं संशोधनाअंती दिसून आलं आहे.

अद्याप हे औषध बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे त्यावरील संशोधन लवकरात लवकर पूर्ण करून मग ते बाजारात उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.