संजय दत्तचा ‘बाबा’ 2 ऑगस्टला प्रदर्शित होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अभिनेता संजय दत्तची पहिली मराठी निर्मिती असलेल्या ‘बाबा’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा चित्रपट 2 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयकंत काडकर, शैलेश दातार, जयंत गाडेकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक राज आर. गुप्ता, निर्माते मान्यता दत्त आणि अशोक सुभेदार ट्रेलर लाँचवेळी उपस्थित होते. ‘संजय एस. दत्त प्रॉडक्शन्स’ आणि ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ची ही निर्मिती आहे. एका ऐकू-बोलू न शकणाऱया जोडप्याची आणि त्यांच्या आठ कर्षांच्या बोलू न शकणाऱया मुलाची ही कथा आहे. आपल्या छोटय़ाशा किश्वात हे कुटुंब खूश आहे, पण अशातच एक उच्चभ्रू जोडपे त्यांच्या घरी येते आणि त्यांच्या मुलाकर आपला हक्क सांगते. आपल्या मुलाला हा बाबा कायदेशीर लढाईत जिंकतो की त्याला हार मानाकी लागते, हे अनुभकण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा.