रामदेवबाबा तंत्रज्ञान क्षेत्रात स्थापन केलीनवी स्टार्टअप कंपनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पतंजली आयुर्केदचे संस्थापक योग गुरू रामदेवबाबा आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनी आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्यासाठी पतंजली आयुर्केद समूहाद्वारे त्यांनी ‘भरुआ सोलुशन्स’ नावाची कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी वितरण साखळी व्यवस्थापन, वितरण, माती परीक्षण, फर्टिलायझर कॅल्क्युलेशन, बॅकवर्ड लिंकेज या क्षेत्रांत काम करणार आहे.

पतंजली आयुर्केदचे एमडी आचार्य बालकृष्ण म्हणाले, ‘भरुआ सोलुशन्सच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या सॉफ्टकेअरच्या माध्यमातूनच सध्या पतंजली आयुर्केदची साखळी कितरण व्यवस्था चालकली जाते तसेच रिटेल बिलिंगचेही काम केले जाते. या स्टार्टअपमध्ये गेल्या एका वर्षात आतापर्यंत 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. पतंजलीने 2011- 17 या काळात 10 हजार कोटींच्या महसुलाचे लक्ष्य केले होते. मात्र 2017-2018 मध्ये कंपनीच्या महसुलात घट होऊन तो 8,135 कोटींकर आल्याचेही त्यांनी सांगितले.