बाबासाहेब कुटे फाउंडेशनचा उपक्रम, 650 कुटुंबांना घरपोच किराणा आणि भाजीपाला

269

सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन असून जमावबंदी लागू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेल्या लॉकडाऊनमुळे खेड्यातील ग्रामस्थांना बाहेर पडणे अशक्य झाले आहे. संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावातील बाबासाहेब कुटे फाउंडेशनने गावातील 650 कुटुंबांना घरपोच एक हजार रुपयांचा किराणा आणि भाजीपाला देण्याची व्यवस्था दर शनिवारी केली आहे. त्यासाठी कुटे फाऊंडेशन संचलित व ओपुलिन्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि गावातील स्थानिक व्यवस्थापन समितीची मदत मिळत आहे.

वांगे, बटाटे, टोमॅटो, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी हा सर्व भाजीपाला कुटे यांनी परिसरातील शेतकऱ्यांकडून खरेदी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील जाग्यावरच आपला भाजीपाला विक्री करता आला. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्केट पर्यंत जाण्याची गरजही पडली नाही. एक किराणा आणि एक भाजीपाला भरलेली पिशवी मोफत घरपोच मिळाल्याने गावातील ग्रामस्थांनी कुटे यांचे आभार मानले. भाजीपाला पिशवीत भरण्यासाठी ग्रामस्था पर्यंत पोहोचविण्यासाठी शाळेला सुट्टी असतानाही सर्व शिक्षक स्टाफ स्वतःहून उपस्थित राहिला आणि त्यांना देखील सामाजिक कार्यात काम करण्याची संधी मिळाली अशी भावना शिक्षक नितीन लोखंडे यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या