बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाच्या पालकमंत्रीपदाचा दिला राजीनामा

राज्याचे सहकार मंत्री व अजित पवार गटाचे नेते बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र अचानक त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान त्यांच्या राजीनाम्यानंतर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.