पाहा व्हिडीओ: नवजात मुलीला रस्त्यावर ठेवून महिला पळाली 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधिक
सामना ऑनलाईन । मुझफ्फरनगर 
उत्तर प्रदेशमधील मुझफ्फराबाद येथे नुकत्याच जन्मलेल्या बाळाला एक महिला रस्त्यावर ठेवून पळून गेल्याची घटन उघडकीस आली आहे. सदर महिला गाडीतून एका रहदारी नसलेल्या गल्लीत गेली व तिने गाठोड्यात बांधलेल्या बाळाला गाडीतून एका घराबाहेरच्या रस्त्यावर ठेवले. त्यानंतर तिने तेथून पळ काढला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्या निर्दयी महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बाळ रडायला लागल्यानंतर तेथील आजुबाजूच्या रहिवाशांनी बाळाला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्या बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी त्या महिलेविरोधात तक्रार दाखल केली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलेचा शोध घेत आहेत.
गेल्या रविवारी केरळमध्ये देखील अशाच प्रकारची एक घटना उघडकीस आली होती. केरळमधील एका चर्चमध्ये एका दाम्पत्याने त्यांच्या दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या बाळाला चर्चच्या आवारामध्ये सोडून पळ काढला होता. त्या दाम्पत्यााला पोलिसांनी अटक केली आहे. चार मुलं जन्माला घातल्याची लाज वाटत असल्याने त्यांनी चौथ्या बाळाला चर्चमध्ये सोडल्याचे त्या दाम्पत्याने पोलिसांना सांगितले.