
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा ठपका बच्चू कडू यांच्यावर ठेवत चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. दरम्यान न्यायालयाने दिलेल्या या चुकीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे कडू यांनी म्हटलं आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने मुंबईत 42 लाख 46 हजार रुपये किंमतीचा फ्लॅट आहे. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्याबाबतची माहिती लपविण्यात आल्याची तक्रार भाजपचे तत्कालीन नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केली होती. याप्रकरणी डिसेंबर 2017 मध्ये बच्चू कडू यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायद्यान्कये गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी बच्चू कडू यांच्या विरोधात अमरावतीच्या चांदूरबाजार न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने या प्रकरणात संपूर्ण साक्षीपुराके तपासून तब्बल पाच वर्षांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड ठोठाकला आहे.






























































