
बदलापूरमध्ये गुरूवारी रात्री एमआयडीसीमध्ये गॅस गळती झाली. त्यामुळे या भागात राहणार्या रहिवाश्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
#WATCH | A gas leak from a factory in Maharashtra’s Badlapur was reported at around 10:22 pm on Thursday. People in the area were having trouble breathing. Fire brigade stopped the leak at 11:24 pm. The situation is under control. No one injured: Thane Municipal Corporation pic.twitter.com/djdZY77DAE
— ANI (@ANI) June 3, 2021
गुरूवारी रात्री 10.222 वाजता बदलापूर एमआयडीसीमध्ये गॅस गळती झाली. त्यामुळे शिरगाव आणि आपटेवाडी परिरसरातील नागरिकांना याचा त्रास झाला. अनेकांना श्वास घेण्यास त्रास होता तर अनेकांच्या डोळ्यात जळजळ होत होती. या गॅस गळतीमुळे तीन किमी परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. नोबल इंटरमिडिटेस या कंपनीत ही गॅस गळती झाली आहे. अग्निशम दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ही गॅस गळतीवर नियंत्रण मिळवले.































































