न्यायालयाचा बनावट निकाल तयार करणाऱ्या वकिलाला दणका

उच्च न्यायालयाचे बनावट निकालपत्र तयार करत अशिलाची 2.57 कोटींची फसवणूक करणाऱ्या वकिलाला मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. गुह्याचे स्वरूप व वकिलाची गुह्याची पूर्वीची पार्श्वभूमी लक्षात घेता आरोपीची सुटका करता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी आरोपी वकिलाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

तक्रारदार उर्मिला तल्यारखान यांनी 2022 साली दिवाणी आणि मालमत्तेच्या वादांच्या खटल्यात युक्तिवाद करण्यासाठी नियुक्त केले होते. त्याने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. शिंदे यांनी पारित केलेले दोन बनावट आदेश तयार करून तल्यारखान यांची फसवणूक केली.