
गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानाला प्रधान मंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा प्रधानमंत्री फसल बिमा योजनेमध्ये विमा काढला असेल आणि त्यांच्या पिकांचे अति गारपिटीमुळे नुकसान झाले तर 72 तासांच्या आत शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना त्याची माहिती दिली पाहिजे. राष्ट्रीय पीक विमा पोर्टल, जिल्हा कृषी विभागाची कार्यालये किंवा विमा कंपन्यांच्या अधिकृत प्रतिनिधींमार्फत शेतकरी आपल्या नुकसानीची माहिती देऊ शकतात. बजाज अलियान्झ इन्श्युरन्सने ‘फार्मित्र’ हे शेतकऱ्यांसाठी विशेष अॅप तयार केले आहे. या अॅपमार्फतदेखील दाव्यांची सूचना कंपनीला दिली जाऊ शकते. सूचना मिळाल्यानंतर कंपनी सरकारी विभागाच्या मदतीने पिकांच्या नुकसानीच्या सर्वेक्षणाची व्यवस्था करेल आणि सर्वेक्षणातील निष्कर्षांच्या आधारे दावे निकाली काढले जातील.
























































