
हिंदुस्थानचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याने फ्रिस्टाईल 65 किलो वजनी गटात इराणचा कुस्तीपटू मोर्तेझा चेका घेसी याचा पराभव केला आहे. या विजयामुळे पुनिया सेमी फायनलमध्ये पोहोचला असून पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
क्वार्टर फायनलच्या सामन्यात बजरंगने मोर्तेझाला 2-1 ने मात दिली. बजरंग सुरुवातीला 0-1 ने पिछाडीवर होता. सुरुवातीला तो डिफेन्सिफ खेलला. मात्र नंतर बजरंगने जबरदस्त खेळ करत 2-1 ने आघाडी घेत सामना जिंकला.
बजरंग पुनियाची सेमी फायनलची लढत ही तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला हाजी एलियेव याच्यासोबत होणार आहे. बजरंग सेमी फायनलमध्ये जिंकला तर हिंदुस्थानचे एक पदक निश्चित होणार आहे




























































