बालेंद्र शाह घेणार नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ; असा होणार सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बालेंद्र शाह नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून शुक्रवारी शपथ घेणार आहेत. ते सनातन आणि पारंपरिक पद्धतीने शपथ घएणार असल्याने त्यांचा शपथविधी सोहळा विशेष होणार ठरणार आहे. शपथविधीचा मुहूर्त चैत्र नवरात्रीतील श्री रामनवमीच्या दिवसाशी जुळून आला आहे.

हा शपथविधी सोहळा केवळ एक औपचारिक नसेल. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये रुजलेला हा एक विशेष सोहळा ठरणार आहे. या शपथविधीवेळी 108 साधू स्वस्तीपठण करतील. ते शुभ आणि मंगलमय मानले जाते. याव्यतिरिक्त 107 बौद्ध लामा बौद्ध परंपरेनुसार शांती आणि समृद्धीसाठी असलेली प्रार्थना, मंगल पाठाचे पठण करणार आहते . तसेच, 7 ब्राह्मण शंखनाद करणार आहेत.

हा शपथविधी सोहला संपूर्ण सनातन पद्धतीने पार पडणार आहे. हा कार्यक्रम नेपाळच्या बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतिक ओळखीचेही प्रतिबिंब दर्शवेल. जिथे विविध परंपरांचा एकत्रितपणे आदर केला जातो. एकंदरीत, बालेंद्र शाह यांचा शपथविधी सोहळा हा धार्मिक विधी, सांस्कृतिक प्रतीके आणि राष्ट्रीय महत्त्व यांचा एक भव्य कार्यक्रम ठरणार आहे. जो देशात नवीन सरकार स्थापन झाल्याने नव्या आशेचा संदेशही देईल.