
कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे कामकाजावर पडणारा ताण लक्षात घेऊन तातडीने कर्मचाऱयांची भरती करा, या मागणीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱयांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक देशव्यापी संप केला. त्यामुळे राज्यासह देशभरातील ग्राहकांना संपाचा फटका बसला.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सध्या कर्मचाऱयांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱयांवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे कर्मचाऱयांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून सातत्याने करण्यात येत आहे, मात्र मागणी करूनही बँकेचे व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करत आहेत.
.