बँक कर्मचाऱ्यांचा संप टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दिवसांच्या सुट्टीला लागून सोमवार आणि मंगळवारी होणारा बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप अखेर टळला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाच दिवसांचा आठवडा करावा, जुनी पेन्शन लागू करावी अशा आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी 30 आणि 31 जानेवारी रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. शनिवार आणि रविवारच्या, सुट्टय़ांना लागून हा संप करण्यात येणार होता. त्यामुळे सलग चार दिवस बँकिंग व्यवहार ठप्प होणार होते. मात्र आज बँक कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या संघटनांची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी दोन दिवसांचा संप स्थगित करण्याचा निर्णय झाल्याची माहिती बँक कर्मचारी संघाचे महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी दिली. तर सरकारसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याने तूर्तास संप स्थगित करण्यावर एकमत झाले.