
जून महिन्यात एकूण 12 दिवस देशभरातील बँका बंद राहणार आहेत. आरबीआय हॉलिडे कॅलेंडरनुसार जून महिन्यात 6 जून बकरी ईद (ईद-उल-अधा) निमित्त तिरुवनंतपुरम आणि कोचीमधील बँकांना सुट्टी असेल. 7 जून बकरी ईद (ईद-उज-जुहा) निमित्त बँका बंद राहणार आहेत. 11 जून रोजी संत गुरू कबीर जयंती, सागा दावानिमित्त गंगटोक व शिमला येथील बँका बंद राहणार आहेत. 11 जून रोजी संत गुरू रथ यात्रा, कांगनिमित्त भुवनेश्वर आणि इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी आहे. 30 जून रोजी रेमनानिमित्त मिझोरममधील बँका बंद राहणार आहे. 14 व 27 जून दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्याशिवाय जूनमध्ये पाच रविवार असल्याने बँकांना सुट्टी आहे.