
प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांचे सोन्याच्या दागिन्यांवरील प्रेम सर्वश्रृत आहे. स्टायलिश कपडय़ांसोबत ते अंगभर सोन्याचे दागिने परिधान करतात. धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ समजले जाते. यंदा बप्पी लहरी यांनी आपल्या ‘गोल्डन कलेक्शन’मध्ये कोणत्या दागिन्यांचा समावेश केला असेल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या सस्पेन्सवरून पडदा हटवला आहे.
बप्पी लहरी म्हणाले, माझ्याकडे सोन्याच्या साखळ्या आणि ब्रेसलेटचे भरपूर कलेक्शन आहे. त्यामुळे आता मी दागिने खरेदी करणे बंद केलेय. खूप दिवसांपासून एक सोन्याचा कप सेट खरेदी करण्याची माझी इच्छा होती. अखेर धनत्रयोदशीनिमित्ताने मी माझ्या पत्नीला ही इच्छा बोलून दाखवली. तिने तो सुंदर सोन्याचा कप सेट मला भेट दिला आहे. पुढे ते म्हणाले, माझ्याकडील सोनसाखळ्या माझ्यासाठी सुंदर आठवणी आहेत. प्रत्येक सोनसाखळीला मी ‘बालाजी’, ‘गणपती बाप्पा’, ‘हरे कृष्णा’ अशी नावे दिली आहेत.




























































